आरव की डायरीः शैक्षणिक सहल फन अँड फूड पार्क, नागपूर
माझी शाळा श्रीराम प्राथमिक,अमरावती, इथे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये एक शैक्षणिक सहल जात असते आणि माझे या शाळेचे पहिले आणि आखरी वर्ष होते. मला सर म्हणत होते कि चौथीच्या विद्यार्थ्यांना पहिले यावे लागणार कारण आमचे आखरी वर्ष आहे. जेव्हा शाळा चालत होती तेव्हा आमचा प्रोजेक्टरचा वर्ग होता तर सरांनी प्रोजेक्टरचा कनेक्शन कॉम्पुटर सोबत काढून टाकला. त्या कॉम्पुटर मध्ये एक फाईल तयार केली. सरांकडे दोन-तीन कागदं होते. त्याच्यावर लिहिलं होतं कि सहलीला कोण-कोन येणार, ते सरांना कॉम्पुटरवर कॉपी करायचे होते. ते कॉपी केल्यानंतर चौथीची वेळ आली, सरांनी एका एकाला विचारले कि तू सहलीला येणार आहे काय? मग माझ्या मित्राची म्हणजे कार्तिकची आई सरांकडे आली आणि सहलीचे पैसे दिले. सर म्हणाले कि कार्तिकने पहिली आणि खिडकीची सीट घेतली .
त्याच्या नंतरच्या दिवशी मी बाबाला म्हटलं कि मागच्या वेळेस मी आनंद मेळाव्याचे अनुभव लिहिले होते, तर तुम्ही मला या ट्रिप साठी पैसे द्या. जर तुम्ही नाही दिले तर मी कशाचाच अनुभव लिहिणार नाही. अश्या मी दरवेळी ट्रिप साठी पैसे मागायला धमकी देत होतो, पण बाबांनी त्याच्यावर अट लावली. ती होती जर तू या ट्रीपचा पन अनुभव लिहिशील तर मी तुला पैसे देणार, जर तू नाही लिहिशील तर जीवनात खूप ट्रिप पडल्या आहे तेव्हा मी जाऊ देणार नाही.
मी तयारी केल्या नंतर शाळेत गेलो आणि पैसे दिले, तेव्हा कुठे मला बरं वाटलं. त्या दिवशी मला आणि ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांना ऑफिस मध्ये बोलवलं, आम्हाला सूचनेचे कागद दिले आणि त्यामधे लिहिले होते कि तुम्हाला काय -काय आणायचे आहे. ट्रीपच्या आदल्या दिवशी मला टेन्शन आले कि मी उद्या काय – काय नेऊ, मग आईने मला पैसे दिले, आणि जे -जे त्या कागदात आहे ते -ते मी आणले. मी आईसोबत गाडीवर गेलो. चिप्स, कुरकुरे आणि बिस्किटचा पुडा आणला. माझ्या बॅगेची चैन खराब होती म्हुणुन मी बाबाच्या बॅगेत सामान भरले. मग मी झोपलो.
सकाळ झाल्यानंतर आईने मला ५ वाजता उठवले कारण सरांनी सगळ्यांना ६.३० वाजता शाळेत हजर राहायला सांगितले. मला खूप थंडी लागत होती म्हणून मी ५ मिनिटं अजून झोपलो. मी सकाळी उठलो, ब्रश केल्यानंतर दूध -चहा घेतला. आईने मला जबरदस्तीने आंघोळ करायला लावली. सर बोलत होते कि आपण सकाळी आंघोळ केली नाही तरी चालते कारण आपली आंघोळ तिकडेच होणार आहे. आई म्हणाली कालची आंघोळ आणि आज पूल मध्ये जाइ पर्यंतचा वेळ माहित आहे का किती आहे? २४ तास !!!!! मग तू बिना आंघोळीचा राहशील काय ?
मग मला आंगोळं करावीच लागली. मी कपडे घातले, आई बोलली कि रस्त्यात तुला थंडी लागणार म्हणून एक स्वेटर घेऊन जा. मी आईसोबत ६.२० ला निघालो. तिकडे आधीच काही जण होते. जास्तीत जास्त मुलं आल्यावर सरांनी आम्हाला बाहेर रांगेत बसायला लावलं. सगळ्या टिचरांनि आपापले गट केले, जसे १५-२० मुलं एका शिक्षकाला. कोणाचा तरी बर्थ डे होता म्हणून आमच्या शाळेला स्पीकर आणि तीन माईक गिफ्ट दिले. आम्ही विचारलं कि हा स्पीकर सहली मधे नेणार काय ? तर सरांनी तेव्हा नाही म्हटलं, पण, सहलीच्या दिवशी मात्र या प्रश्नाला होकार दिला.
आम्ही बस जवळ एक-एक करून गेलो. बसमध्ये बसताच मला वृषभ च्या आईने म्हटलं कि वृषभ वर लक्ष ठेवशील. मी आखरी सीटवर वृषभ जवळ बसलो. सर म्हणाले कि तुम्ही असेच चालणार कि नाचत नाचत !!! . एक मुलगा म्हणाला कि हा स्पीकर कशासाठी आणला ? बस थांबवल्या गेली, आम्ही विचारलं कि हि बस का थांबवली ? सर म्हणाले, कोणीतरी येणार आहे. मग त्या आल्या बरोबर त्यांनी म्हटलं ‘गिरी-मिरी, गिरी -मिरी, धुमधडाका !!!’. हे मुलांनी ऐकल्याबरोबर त्यांना समजून गेलं कि या जुन्या शिक्षिका आहेत. अमरावती तुन निघाल्यावर आम्ही डान्स करायला सुरुवात केली.
सगळे मुलं समोर नाचत होते, मी आणि वृषभ समोर बसलो कारण श्रवण बोलवत होता. मला नाचायला खूप जीवार येत होतं, म्हणून मी झोपण्याचं नाटक केलं. बस मधे स्पीकर दणादण वाजत होता. आता मला वाटलं कि या बस मध्ये झोपणं शक्य नाही. सरांनी पण माझ्या कानात आवाज केला- ऑ s s s s , मग मला नाचावेच लागले. सर माईक वर म्हणाले, चौथीच्या मुलांनी लक्ष दया. तुमच्या पुस्तकातील पाठा मधे एक फॅक्टरीमधली चिमणी धुरा साठी आहे, ती आता आपण पाहत आहे . आणि त्याबद्दल सरांनी माहिती पण सांगितली. मग वर्धा नदी आली, सर म्हणाले कि या नदीत एक एक रुपया टाकल्याने नदी मोठी होते, आता ती नदी एवढी मोठी झाली कि त्यामध्ये कोणी एकही रुपया टाकत नाही. सर म्हणाले कि आपण आता घाट चढत आहोत म्हनजेच दरी. आता फक्त ५ ते १० मिनिट फन अँड फूड पार्क मध्ये पोहोचायला लागणार आहे.
मग आम्हाला फन अँड फूड पार्कचं गेट दिसलं. अंदर ख्रिसमस ट्री बनवत होते, तिथे त्यांनी बॅण्ड वाजवणाऱ्यांना बोलवलं आणि आम्हाला डान्स करायला सांगितलं. ते झाल्यानंतर त्यांनी मुलांचे दोन आणि मुलींच्या दोन रांगा बनवायला सांगितले. एका काकांनी विचारलं कि तुम्हाला गाणे म्हणता येते का ? दोन जणांनी हात वर केला. एक होती टाले सरांची मुलगी ओवी आणि निस्ताने सरांचा मुलगा. निस्ताने सरांच्या मुलाने ‘यारा तेरी यारी को’ हे गाणं म्हटलं, ओवीचं मला आठवत नाही. काकांनी म्हटलं कि तुम्हाला एक ते पंधरा पर्यंत इंग्रजी आणि हिंदीत अंक येते का ? तुम्ही असं म्हणू शकता काय ?
1,२,3,४,5,६,7,८,9,१०,11,१२,13,१४,15,असे तुम्ही लवकर म्हणून दाखवा. जसे one ,दो, three , चार ,five , छे ,seven, आठ ,nine दस, eleven ,बारा,thirteen , चौदा, fifteen . खूप जणांनी प्रयत्न केला पण लवकर नाही म्हणू शकले . ते म्हणाले हे जो म्हणणार त्याला फन अँड फूड कडून गिफ्ट. मग आम्ही अंदर गेलो तिथे मॅमल, प्राणी आणि गांधीजींची मूर्ती होती आणि बाजूला एक मोठा लॉन होता त्याच्या समोर जेवणाची जागा होती. तिथे आम्ही जेवतच होतो कि सर म्हणाले स्विमिंग पूल मधून आल्यानंतर तुम्हाला खूप भूक लागणार म्हणून आता डबा खाऊ नका, आम्ही नाष्टा देतो ते तुम्ही खा. नाष्ट्यात कचोरी आणि चिवडा होता. कचोरी टाले सरांनी बनवली आणि चिवडा निस्ताने सरांनी बनवला होता. मग आम्ही वॉटर पार्क मध्ये गेलो. सरांनी स्विमिंग कॉस्ट्यूम आणले आणि आम्ही ते घातले. आम्हाला कमी पाण्याच्या पातळीत नेलं , तिकडे आम्हाला खूप मजा आली . मी एक वेळा श्वास थांबवतो आणि पाण्यात डुबकी मारतो, कधी कधी डुबकी मारतांना मी पोहून कोणाचा पाय पकडतो. सर म्हणाले कि आता तुम्ही घसर गुंडीवरपण जाऊ शकता.
मी पहिल्या वेळा सगळ्यात खालच्या घसर गुंडीवर गेलो तिथें जास्त काही घाबरलो नाही. मग मी दुसऱ्या म्हणजे वरच्या घसरगुंडीवर गेलो पण तिथे इकडून तिकडे , तिकडून इकडे त्याच्यात काही सरळ नव्हत फक्त आडव, पण मजा आली. कार्तिक सगळ्यात वरती जात होता तर मी पण त्याच्यात गेलो , पण त्याच्यात एकही मोड नव्हती पहिले थोडसं तिरपं आणि मग एकदम तिरपं, त्याच्या खाली एक स्विमिंग पूल होता. सरांनी आम्हाला इकडून निघायला सांगितलं आणि जिथे डान्स चालू होता तिथे जायला सांगितलं. मग एका काकांनी सांगितले कि हि मुलं स्विमिंग पूल मधे कुठपर्यंत जाऊ शकतात आम्ही तिकडे खूप मजा केली, सरांवर पाणी उडवलं, मग वाकोडे मॅडमने एक – एक जणांचे स्पेशल फोटो काढले. थोड्या वेळाने मोठे लोक जोराने नाचू लागले त्यामुळे आमच्या कडे खूप जोराने लाटा येत होत्या. मी लाटांकडे पाय करत होतो आणि हात खाली, जेव्हा लाट आली तेव्हा मी हात उचलून घ्यायचो. मी पाण्याच्या प्रभावाने पाठीमागे घसरत होतो. सरांनी आम्हाला बाहेर निघायला सांगितलं आणि किल्ल्या मधल्या तलावासारख्या जागेवर नेलं. मग मला खूप आश्चर्य वाटलं, मी माझ्या पायाकडे पाहिलं तर माझ्या एका अंगुठयातून रक्त येत होतं, म्हणून निस्ताने सरांनी मला मेडिकलमध्ये नेलं. डॉक्टरांनी मला कापसाला डेटॉल लावून जिथे लागलं आहे तिथे लावलं.
एक औषध कापसाला लावून तिथे लावली आणि मग पूर्ण बोटावर पट्टी लावली. आम्ही शॉर्टकटनी आलो. मी स्विमिंगपुल मध्ये उतरल्यावर पाहिलं कि त्या लाटा गेल्या होत्या. मग आम्हाला टाले सरांनी म्हटलं आता कपडे बदलवा लागते, आता सगळे जनं बाहेर निघा. आम्ही कपडे चेंज केले, तेल लावलं आणि भांग केला. मॅमनी जिथे आम्ही नाष्टा केला तिथे नेलं. तिथे आम्हाला गोल करून बसायला सांगितलं. एका मुलाचं शर्ट हरवलं होतं. तर मॅमनी एकेकाची कॉलर पाहली, पण ते शर्ट कोणालाच सापडलं नाही. त्या मुलाचं नाव दर्शन होतं. मॅमनी आम्हाला जेवायला सांगितलं आणि लाडूपण दिला. मग सगळे टीचर आणि आम्हाला खेळायला लावले . तीन वाजेपर्यंत एकही टीचर नाही आले.
वाकोडे मॅडम ने तीन वाजता आम्हाला अम्युझमेंट पार्क मध्ये नेलं . आम्ही तिकडे धावत धावत फ्रुट गार्डन मधून गेलो. आम्हाला गार्डने थांबवलं आणि ते म्हणाले इथून समोर हळू हळू जायचं. मग आम्ही अम्युझमेंट पार्क च्या सगळ्यात पहिल्या झुल्यावर गेलो. तो होता स्पेसशिपचा झुला. त्याच्यात बसायच्या चार सिटा होत्या आणि काही दाबदुब कराय साठी बटना. जशी पृथ्वी फिरते तसेच तो स्पेसशिप फिरत होता. याच्या पुढे मी खूप मजा केली.
मला वाटले कि आता मी खूप थकलो आहे आणि हळू चालणाऱ्या झुल्यावर मला जायचं आहे, असे मी विचार करत होतो, पण ते खरच झालं. सरांनी आम्हाला एका मछलीच्या झुल्यावर वर नेले, तो झुला पाण्यात होता. मधात एक मोठा खंबा आणि पाण्याच्या खालून त्या खंब्याला लोखंडाच्या द्वारे त्या मछल्या जुडल्या होत्या. जेव्हा बटन दाबली तेव्हा तो खंबा फिरणार आणि त्याला जुडलेले लोखंड फिरणार मग त्या मछल्या पण फिरणार. त्या एवढ्या हळू फिरत होत्या कि आम्ही त्या स्पीडवर उतरू हि शकत होतो.
सर म्हणाले कि हा चांगला झोका नाही, चला आता उतरा. त्याच्याच बाजूला एक एरोप्लेन चा झुला होता मग आम्ही पायऱ्यांनी वरती आलो . ते एरोप्लेन वरती होते. मी तिथे टाले सरांसोबत बसलो होतो, आणि माहित आहे ते एरोप्लेन त्या मछल्यानच्या १०x स्पीड ने चालत होते !!!. स्पीड असल्याने आम्हाला मजा पण आली आणि सरांनी फोटो पण काढले . आम्ही तिकडेच थांबलो.
सर , मॅम आणि काही मुले दुसरीकडे गेले. आम्ही त्यांना शोधत शोधत त्यांच्या जवळ आलो. तिथे एक झुला होता तो खाली गेला मग वरती, मग खाली मग वरती. सरांसोबत जे मुलं आलेले होते ते झुल्यामधे पहिलेच बसले, त्यांचा टर्न झाल्यावर आम्ही बसलो. जे पहिले बसले होते ते तर पूर्णच थकले होते आणि आम्हाला म्हणत होते कि तुम्ही जाऊ नका, पण आम्ही गेल्यावर आम्हाला काहीच नाही वाटले. जेव्हा श्रवण आला तेव्हा मी त्याला हात दाखवत होतो.
मला एका झुल्यावर बसायचं होतं, तो असा होता कि मधात एक मोठा खंबा, त्याच्यावर एक गोल छत आणि छताला आजुबाजूनी खूप दोऱ्या आणि त्या दोऱ्यांना सिटा. जेव्हा ती छत फिरते तेव्हा त्याला बांधलेले जे दोरं आहेत ते फिरणार, मग त्या दोराला बांधलेल्या सिटा फिरणार. छ्त जर जोरात फिरणार तर त्याचा वेग खूप असल्याने जे दोरं सिटांच्या भाराने सरळ असतात ते तिरपे होणार. पण ते आमच्यासाठी नव्हत. दिल्लीला आम्ही गेलो होतो तेव्हा तर मी अश्या झुल्यात बसलो होतो . आम्ही जेव्हा एका कपाच्या झुल्यात गेलो तर ते बंद होतं तर सरानी कोणाला तरी फोन लावला, ज्यांना फोन लावला ते मिटिंगमध्ये होते. मग तिथे भांडण झालं, मी तिथे बोर होत होतो. त्याच्या दुसऱ्या बाजूला “भुतिया रात” नावाचं एका रूमवर पोस्टर होतं मी तिकडे गेलो. त्या रूम मधे एक ट्रॅक होता, त्याच्यावर एक छोट्या ट्रेनचा डबा. मी आणि काही जण त्या डब्यात बसलो. तिथे भुताचे खूप आवाज, किंकाळ्या ऐकू आल्या. आमच्या डब्याच्या समोरा समोरून एक भूत गेला आम्हाला तेव्हा एव्हढी भीती वाटली कि मी सांगू शकत नाही.
मी तिथल्या झाडा झुडुपांना पाहतच होतो कि पाठीमागून एका वाघाची गर्जना ऐकू आली, आणि समोरून एक नकली वाघ चालत -चालत समोर गेला. काही वटवाघूळ आवाज करत करत गेले. समोर एक एवढा भयानक चेहरा होता, त्येच्यावर काही उजेड नव्हता, जेव्हा गाडीचा डब्बा तिथे आला तेव्हाच त्याच्यावर पांढरा लाईट पडला पण मी काही त्याने घाबरलो नाही. बरं झालं कि ते “भुतिया रात” संपलं, जर एक तास ते असतं तर मी रडलोच असतो ! ! !
सगळी मुलं आल्यावर सरांनी त्याच्या बाजूने म्हणजे स्पेस ट्रॅव्हल याच्यात एक वेळा चक्कर मारून यायचं ठरवलं . तो होता साधा रस्ता आणि त्याच्या आजूबाजूला स्पेसचं पोस्टर. ते पोस्टर गोल गोल फिरत होते जर आपण लगातार त्या पोस्टर वर पाहिलं तर आपण हिप्नोटाईस होऊन आपल्याला वाटते कि आपण स्पेसमध्ये आहे. ते स्पेसचं पोस्टर फिरत असते तेव्हा आपल्याला वाटते कि हा रस्ता फिरत आहे . मग सरांनी आम्हाला जे जे ग्रुप मध्ये आहे तसे लाईन मध्ये लागायला सांगितलं .
संध्याकाळ झाली, आम्ही फ्रुट गार्डन मधल्या रस्त्यामधून जिथे जेवन केलं तिकडे गेलो . तिकडे गेल्यावर सर म्हणाले तुम्हाला खूप भूक लागली असणार तर तुम्ही उरलेला डबा खाऊ शकता, पण आमच्याकडे डबाच उरला नव्हता फक्त काही जणांचाच डबा वाचला होता . जो सकाळी कचोरी आणि चिवडा खाल्ला होता तो वाचला होता, म्हणून सरांनी आम्हाला कचोरी आणि चिवडा दिला. सगळ्यात पहिले ज्या काकांनी आम्हाला प्रश्न विचारले होते ते बोलत होते कि जेव्हा तुम्ही इथून जाणार तेव्हा आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार. मग आम्हाला एक – एक विध्येच झाड गिफ्ट मधे दिलं. आम्ही एक्सिट गेटवर गेलो, तिथे आता खूप छान लाइटिंग लावली होती. जो पहिले ख्रिसमस ट्री बनत होता त्याला आता पूर्णपणे लाइटिंगने झाकले होते. मग आम्ही बसमधे बसलो. सर बसमध्ये बसायच्या आधी म्हणाले कि पहिले माझ्या टीम मधील मुली व मुलं बसणार. सुरुवातीला जेव्हा आम्ही बस मधून उतरलो होतो तेव्हा सरांनी आपापले स्वेटर बस मध्ये आपल्या जाग्यावर ठेवन्यासाठी सांगितले होते तर आम्ही स्वेटर घालून बस मध्ये बसलो. जेव्हा बस चालू झाली तेव्हा आम्ही तिकडच्या लोकांना एक मोठा Bye Bye !!! केला
जेव्हा आम्ही पार्कच्या बाहेर गेलो तेव्हा आम्ही सगळे खूप थकलो होतो. पण काही जणांच्या अंगात आताही नाचायसाठी ताकद होती. पण माझ्यामधे काहीच ताकद नव्हती म्हणून मी एकवेळा खरंच झोपण्याचे नाटक केले पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण कोणी माझ्या कानात फुक मारत तर कोणी माझ्या गालावर हात लावत. मग मी उठून नाचायला लागलो. सगळे मुलं सरांना एक-एक गाणं सांगू लागले . त्याच्यातलं सगळ्यांना आवडणार गाणं होत “तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव” .जेव्हा सर बोलत होते कि आता वडापाव लावणार आहे तेव्हा जे -जे झोपलेले असतात ते सगळे नाचायसाठी तयार राहतात. सर म्हणाले आता आपण १५ ते २० मिनिटात शाळेत पोहोचणार आहे, आता आपण अमरावतीच्या जवळ आलो आहे. इकडचे सगळे लोकं आपल्याला ओळखतात, म्हणून आपण चांगले गाणे लावूया . मग मला आठवलं कि जे आम्हाला विध्येच झाड मिळालं ते बरोबर आहे कि नाही ? आम्हाला खूप गर्दी दिसली सर म्हणाले कि आता शाळा आली आहे पण आम्हाला शाळा दिसलीच नाही .मग माझं नाव आल्यावर मी आई-बाबासोबत घरी गेलो. घरी आल्या बरोबर मी निवांतपणे झोपलो .
पढ़िए: आरव की डायरीः दिल्ली के चिड़ियाघर की सैर
पढ़िए आरव की डायरीः चोखी ढाणी सोनीपत की कहानी
(डायरी के यह पन्ने इस मायने में बेहद ख़ास हैं क्योंकि इसे चौथी कक्षा में पढ़ने वाले आरव गजेंद्र राउत ने लिखा है। वे एजुकेशन मिरर के सबसे नन्हे लेखक हैं। उनकी दो डायरी जब प्रकाशित हुई थीं, तब वे दूसरी कक्षा में ही पढ़ रहे थे। अभी हिन्दी से मराठी भाषा में लेखन का नयापन महसूस करिए आरव की डायरी में।)
खूप छान लेख आहे हा.
Khup chan anubhav……tu tr murti lahan kirti mahan aahes
Very good Aarav.
Very nice Aarav. Keep it up.
khup sudar aarav…. partekshat tuzi sahal aanubhavlya sark vatl…. 👌👌
Good writing efforts continue you have long way to go
खूप छान आणि विस्तृत वर्णन केलं आहे आरव ने. मुख्य म्हणजे सध्याच्या काळात जेंव्हा आपल्या मातृभाषेला लोक दुय्यम दर्जा देतात, एका मुलाने इतकी सुंदर मराठी लिहिल्याचे बघून फार फार बर वाटलं.
खूप सुंदर… all the best dear👍
Apratim….khupach chan….Keep it up Aarav…All the best beta…..