कोरोना काळातील माझे अनुभव: आरव राउत
मार्च महिना चालू होता, मी रोजच्या सारखं सकाळी उठलो, शाळेत गेलो, तिथे मला आणि माझ्या मित्रांना सांगितल्या गेले कि शाळा पंधरा दिवसा पर्यंत बंद राहणार. मी ही बातमी ऐकून खूप खुश झालो. मग माझी शाळा संपली मी घरी आलो आणि बॅग ठेवली बाहेर खेळायला गेलो. मी आणि माझे मित्र खूप खेळलो.
दुसऱ्या दिवशी मी उठलो तेव्हा मला लक्षात आले कि माझी शाळा पुढच्या पंधरा दिवसा पर्यंत बंद राहणार मग मी शाळेची तयारी करणे सोडून बाहेर खेळायला गेलो पण आश्चर्य बाहेर एकही मुलगा नव्हता. मला याचे कारण माहित नव्हते म्हणून मी घरात आलो आणि बाबाला विचारलं की बाहेर एकही मुलगा का दिसत नाही आहे आणि शाळेला पंधरा दिवसाची सुट्टी का आहे? कोणता सण पण नाही? मग बाबाने सांगितले कि पूर्ण जगात कोरोना पसरला आहे आणि लाखो लोक मरत आहे यामुळे सरकारने पूर्ण भारतावर जनता कर्फ्यू लावला आहे. जनता कर्फ्यू म्हणजे जर कोणी आपल्या घराच्या बाहेर निघणार त्याला पोलीस दंडे मारणार म्हणून तू पण बाहेर नको जाऊ आणि घरात राहा असे बाबाने म्हटले. त्या संध्याकाळी माझी संजना ताई पण आली तिला इथे राहून स्टॅटिस्टिक्स शिकायचे होते. आमच्याकडे एन. सी. इ. आर. टी चे काही पुस्तक होते म्हणून ती आली होती. घरात मला खूप बोर वाटत होतं काही काम पण करायला नव्हतं.
मी तेव्हा लॅपटॉप ला एच. डी. एम. आय. जोडून काही व्हिडीओ पाहून माझं मन रमवत होतो. तेव्हाच माझ्या ताईचे एन. सी. इ. आर. टी चे पुस्तक संपले म्हणजे त्यामधले स्टॅटिस्टिक्स चे धडे संपले आमच्याकडे एन. सी. इ. आर. टी चे पाचवीपर्यंतचे पुस्तक होते म्हणून बाबाने एन. सी. इ. आर. टी च्या वेबसाईट मधून सहावी ते अकरावी पर्यंतचे स्टॅटिस्टिक्स चे धडे मोबाइल मध्ये डाउनलोड केले आणी ब्लूटूथ ने लॅपटॉपमध्ये पाठवले आणि ताई लॅपटॉपला एच. डी. एम. आय. केबल जोडून टीव्ही वर अभ्यास करत होती आणि मला करायला काहीच नव्हते. मी खूप विचार केला कि मी काय करू, मी काय करू तेव्हाच मला आठवले कि मी दिल्लीला एक वेळा चेस खेळलो होतो आणि मित्रांना खेळताना पाहत होतो, ते चेक, चेकमेट असे काही बोलत होते. मला तेव्हा समजत नव्हते कि चेस मध्ये एक गोटी अलग आणि दुसरी गोटी अलग का चालवा लागते तेव्हाच माझ्या एका मित्राने मला चेस चे सगळे नियम समजवून सांगितले आणि कसे खेळायचे हे पण सांगितले. तरीही मला खेळता येत नव्हते. आजहि मला चेस मधल्या काही गोट्या कश्या चालतात हे आठवते. मग मी विचार केला कि मोबाइल मध्ये चेस डाउनलोड होऊ शकते आणि त्यामध्ये सगळ्या गोट्या कश्या चालतात हे पण सांगतात म्हणून खेळताना सोपं जाणार. मग काय, मी लगेच बाबाचा मोबाइल घेतला आणि चेस डाउन लोड केला. गेम एक दोन एम.बी. चा होता म्हणून दोन मिनिटात डाउन लोड झाला.
माझ्या बाबांना जर त्यांच्या मोबाइल मध्ये गेम दिसला तर डायरेक्ट डिलीट करून टाकत होते, पण हा गेम डिलीट नाही केला कारण कि जेव्हा मी लहान होतो तेव्हा पहिले च्या लॅपटॉप वर बाबा मुंबई ला चेस खेळत होते. मग मी त्यांच्या सोबत टू प्लेअर चा गेम खेळत होतो. मी त्या गेम मध्ये खूप वेळा हरत होतो कारण बाबाला माहित होतं कि चेस कसा खेळावा लागतो. बाबा कडे एक मुलगा शिकण्याकरता येत होता त्याचं नाव वासुदेव. आमच्या मोबाईल वर चेस खेळल्याने तो बोलला कि मी उद्या चेस आणणार. पण त्याने त्या दिवशी चेस आणलाच नाही दुसऱ्या दिवशी पण तसेच. पण तिसऱ्या दिवशी त्याने चेस आणला. जेव्हा मी त्याच्यासोबत पहिल्या वेळेस खेळलो तेव्हा मी पाचव्या सहाव्या चान्समध्ये च हरलो कारण मला त्याच्यातलं जास्त काहि येत नव्हतं आणि तो पण या खेळात एक्स्पर्ट होता. त्याने मोबाइल मधल्या चेस च्या सगळ्या लेवल कंप्लिट केल्या होत्या. बाबाला पण त्याने लवकरच हरवले. तो चेस बोर्ड आमच्याकडे खूप वेळ राहला मी त्याच्यावर खूप खूप खूप चेसची प्रॅक्टिस केली जो पण माझ्या समोर बसत होता मी त्याच्यासोबत चेस खेळलो.
त्याच्यात काही गोट्या हरवल्या होत्या म्हणून खेळतांना आणि त्या गोट्या ओळखायला खूप अडचण होत होति म्हणून मी बाबाला बोललो कि दुसरा चेस विकत आना, दुसरा चेस विकत आना, एका दिवशी बाबाने खरच दुसरा चेस विकत आणला. पण तो २ इन १ होता. त्याच्यात चेस तर होताच पण बिझनेस पण होता. मी त्याला पाहून खूप खुश झालो पण झालं तेच, बाबा जिकंत होते आणि मी हरत होतो पण एक दिवस असा आला ज्याचा इंतजार मला चेस आणल्या पासून होता मी एक वेळा जिंकलो . पण मी तेव्हा जास्त खेळत नव्हतो. मग लॉक डाऊन लागला आणि मी चेस चा डब्बा काढला . जेव्हा पण माझे बाबा संजना ताई च्या घरी जात होते तेव्हा ताई त्यांच्या सोबत एक चेस ची मॅच खेळत होती आणि तिथे तिला चेस मध्ये चॅम्पियन मानल्या जात होते, कारण तिने कॉलेज मध्ये एका मुलीला हरवले. ती मुलगी चेस कॉम्पीटिशन मध्ये आखरी पर्यंत टिकली आणि ताईने तिला हरवलं. बाबांना पण ती हरवत होती. जेव्हा पासून संजना ताई इथे आली ती जिंकत होती आणि तोपर्यंत आम्हाला पण माहीत झाले कि चेस कसा खेळावा लागते म्हणून एक दिवस असा आला कि जो कोणी पण तिच्या सोबत चेस खेळणार तो जिंकणार आणि ती हरणार. आजही देखील मी तिच्या सोबत खेळलो तर ती लवकरात लवकर आणि बुरी तरह हरणार. पण काही वेळा ती जिंकून पण जाते .
मला पूर्णपणे आठवत नाही कि आम्ही सिरीयल कसे बघायला लागलो. एका दिवशी मी लॅपटॉपला HDMI जोडून टीव्हीवर काही पाहत होतो तेव्हा मला आठवलं कि मला चंद्रगुप्त च्या बद्दल जास्त माहिती नाही तर मी टीव्ही वर सर्च केले आणि तिथे काही व्हिडियो आले, मला त्यामध्ये एक व्हिडीओ दिसला जो चाळीस मिनिटाचा होता, मला वाटलं हा व्हिडियो छोटाच आहे एक तासाच्या वर नाही पाहणार. तो संपल्यावर मी पाहल कि त्याचा दुसरा भाग पण आहे, मी तो पण पाहिला, तो संपल्यावर मी पाहल कि त्याचा आणखीन एक भाग आहे. मला एक प्रश्न पडला कि एका व्हिडीओ चे ऐवढे भाग ते पण चाळीस मिनिटाचे. मी तर अस कधीच पाहिलं नव्हत. मला वाटलं कि हि एक सिरीयल असणार. म्हणून मी याची शंका दूर करण्यासाठी कि हि सिरीयल आहे कि नाही हे सर्च करण्याकरिता मी कि वर्ड टाकला -चंद्रगुप्त एपिसोड ५० आणि आल काय चंद्रगुप्तचा ५० वा भाग तेव्हा माझे बाबा पण तिथे उभे होते. त्यांनी एक भाग पण पाहला. त्यांना हि सिरीयल आवडली आणि आजीला पण हि सिरीयल आवडली म्हणून सगळ्यांनी ठरवलं कि आपण रोज रात्री हि सिरीयल पाहू. तेव्हापासून आम्ही सिरीयल पाहायला लागलो. कधी कधी आम्ही रात्री १ वाजेपर्यंत पण सिरीयल पाहत होतो. जेव्हा आम्ही झोपत होतो तेव्हा आम्हि खूप उत्सुक राहायचो कि पुढच्या भागात काय राहणार आणि सकाळी पण तसेच होते म्हणून ती उत्सुकता पूर्ण करण्यासाठी आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर चंद्रगुप्त पाहत होतो. माझ्या हिशोबाने आम्ही दररोज चाळीस मिनिटाचे ८ भाग पाहत होतो. असेच करत करत खूप दिवस झाले आणि सिरीयल मध्ये चंद्रगुप्त गांधारचा राजा बनला, तेव्हा आमचा १०५ वा भाग चालू होता भागाच्या अंत मध्ये हे बोलल्या गेलं कि समोर भाग बनलेच नाही. हि चंद्रगुप्तची फक्त अर्धी कहाणी होती चंद्रगुप्त खूप वेळा संकटात सापडतो आणि चाणक्य त्याला संकटातून काढतो ते पण सुरक्षित पणे मला हेच खूप जास्त आवडलं त्या सिरीयल मधलं. आम्हाला तर आता सिरीयल पाहायची सवयच झाली होती.
आता आम्ही दुसऱ्या सिरीयल आठवू लागलो. आजीला महाभारत पाहायचं होत म्हणून महाभारत लावलं. माझी दीदी तिच्या घरी गेली. मी महाभारताच पुस्तक पहिलेच वाचल होतं पण हे पाहल्या नंतर जे वाचलं होतं ते पूर्णपणे समजलं. महाभारताला महाभारत हे नाव का दिल्या गेलं आहे हे मला समजलं नाही कारण ते एक प्रकारच घरगुती भांडण होतं त्यामध्ये दोघे भाऊ फक्त जमिनी साठी भांडत होते. चंद्रगुप्तची लढाई अर्ध्या भारतासाठी होती म्हणजे मगधसाठी होती आणि महाभारताची लढाई अर्ध्या दिल्ली साठी होती म्हणजे महाभारताची लढाई चंद्रगुप्तच्या लढाई समोर खूप छोटी होती. जेव्हा सकाळ होत होती तेव्हा मी चेस च्या नवीन नवीन चाली बनवत होतो आणि दुसऱ्यांसोबत खेळत होतो. आम्ही महाभारत दुपारच्या वेळी पाहत नव्हतो कारण सगळ्यांना झोप येत होती आणि आम्ही रात्री फक्त दोन भाग पाहत होतो. आतापर्यंत माझे कोरोना काळातील जीवन असेच चालत होते. महाभारताची लढाई संपत आली तेव्हा आम्ही मन रमवण्यासाठी संध्याकाळी माडीवर बॅट बॉल खेळत होतो.
खेळता खेळता मी विचार करत होतो कि महाभारत संपत आलं आहे, दुसरी सिरीयल शोधावी लागणार. मग मी बाबाला विचारलं कि यानंतर कोणती सिरीयल पाहणार आहे? मग बाबा बोलले कि ब्योमकेश बक्षी हि चांगली सिरीयल आहे आपण ती पाहू शकतो. मग काय राहलं महाभारत संपल्यावर हीच सिरीयल पाहू असं आमचं ठरलं. महाभारताची लढाई संपली आणि आम्ही ब्योमकेश बक्षी ह्या सिरीयलचा पहिला भाग लावला. ब्योमकेश बक्शी हि सिरीयल एका जासूसची आहे. त्यामध्ये ब्योमकेश बक्षी स्वतःला जासूस म्हणत नव्हता, तर तो स्वतःला सत्यमवेशी ब्योमकेश बक्षी असे म्हणत होता. सत्यमवेशी म्हणजे सत्याचा शोध लावणारा. पहिला भाग संपल्यावर मी जरा घाबरलो कारण कि मी खून , दरोडे , चोरी असं पहिल्या वेळेस पाहत होतो. या सिरीयल च्या वेळेस आमची रोज टी व्ही पाहण्याची क्षमता ८ भागावरून वरून फक्त १ भागावर पोहोचली. ती सिरीयल खूप छोटीसी होती. त्या सिरियलचा शेवटून तिसरा भाग हा भुताचा होता. त्या भागात एका घरात खून झाला असते आणि आता त्या घरात भाडेकरू राहतात त्या भाडेकरूंना वरच्या खिडकीतून भूत दिसत होता आणि लवकरच हि गोष्ट सगळीकडे पसरली. ब्योमकेश बक्षीचा भुतांवर विश्वास नव्हता, म्हणून तो एकदा त्या घरात गेला. मी जेव्हा त्या भुताला पाहल तेव्हा मी माझं तोंड झाकून घेतलं होत. त्यांना पण तो भूत दिसला आणि जेव्हा मला माहित पडलं कि एक माणूस भुताचा नकाब घालून बास्यांवर चालून खिडकीवर येत होता तेव्हा माझ्या मनाला शांती मिळाली. ती खूप छोटी सिरीयल होती जवळपास बत्तीस भागांची असणार.
ती सिरीयल संपली आणि मोठेबाबांनी सांगितलं कि अशीच एक सिरीयल आहे, तहकीकात पण आम्ही ती सिरीयल लगेच लावली नाही. आम्ही मालगुडी डेज लावून पाहलं पण ते कोणालाच आवडलं नाही म्हणून आम्ही तहकीकातचा पहिला भाग लावला. तहकीकात मध्ये सॅम डिसिल्वा नावाचा एक जासूस असतो त्याचा एक पार्टनर पण असतो ज्याचे नाव गोपी असते. सॅम डिसिल्वा हा खूप अलग विचार करतो पण गोपी आणि सॅम चा एक पोलीस मित्र सारख्याच विचाराचे असतात त्या दोघांना जर कोणावर शक झाला तर ते त्याला लगेच पकडणार पण त्यामधला एकही माणूस गुन्हेगार नसतो. सॅम डिसिल्वा हा खूप चिडतो कारण कि पहिल्या भागात खुनी कोण आहे हे त्याला माहित नसते. तो बोलतो कि “शक करना हमारे पेशे कि बुनियाद है”. मला त्याचा शेवटून दुसरा भाग खूप भयानक वाटला कारण कि तो पण एक भुताचा भाग होता. त्या भागात भूत येण्याच्या आधी खुर्ची हालत होती आणि नंतर मला माहित झालं कि त्या खुर्चीला खालून मॅग्नेट लावलं होतं आणि त्या रूमच्या खालच्या रूममध्ये एक बाई एक मोठं मॅग्नेट काडी ला लावून त्या खुर्चीला हलवत होती. हे माहित झाल्यावर मला खूप चांगलं वाटलं, नाही तर मी घाबरलोच होतो. असं करत करत तहकीकात संपण्याच्या वेळेस घरी फक्त आम्ही चार जणच होतो म्हणजे मी ,आजी ,आई आणि बाबा. कारण बाकीचे सर्व गावी गेले होते.
आता सगळे जण विचार करायला लागलो कि पुढे काय पाहायचं. तेव्हाच आजी बोलली कि अलीबाबा चाळीस चोर हि खूप चांगली सिरीयल आहे आणि मग काय, आम्ही अलीबाबा चाळीस चोर हि सिरीयल लावली. तेव्हा संध्याकाळ झाली होती आम्ही रोज तेव्हा वरती माडीवर बॅट बॉल खेळत होतो. पण मी आणि बाबांनी थोड्या वेळानंतर खेळण्याचं ठरवलं आणि अलीबाबा चाळीस चोर लावलं तेव्हा आजी खाली होती मग आम्ही आजीला पण बोलवलं. एक भाग झाला आणि मी दुसरा भाग लावला. मला दुसरा भाग पाहायचा होता पण बाबाने मला वरती नेले. आता आमची अलीबाबा चाळीस चोर हि सिरीयल चालू होती. बाबांनी ती सिरीयल लहानपणीच पाहली होती म्हणून त्यामधले काही डॉयलॉग्ज बाबा पहिलेच बोलून टाकायचे आणि मला माहित असलेलं पाहण्यात मजा येत नाही असे म्हणायचे. मी अरब देशामधली पाहलेली हि पहिली सिरीयल होती. त्यामध्ये सगळं असली होत फक्त एक गोष्ट सोडून, ( खुल जा सिम सिम) हे मंत्र याला मराठीत (तीळा तीळा दार उघड) असे म्हणतात. हे मला पहिले माहित नव्हते मला हे बाबांनी सांगितले. एका रात्री जेव्हा भाग सुरु होता तेव्हा बाबाने सांगितले कि या भागात ते चाळीस चोर तेलाच्या पिंपात येणार, आणि अलीबाबा चाळीस चोर मध्ये तसंच झालं ते सगळे चाळीस चोर एका तेलाच्या पिंपात बसून अलिबाबाच्या घरी आले.
पण अलिबाबाला माहित झालं कि हे सगळे चोर या तेलांच्या पिंपात आहे. म्हणून अलिबाबाने एका मोठ्या भांड्यात तेल गरम केलं आणि एक एक भरणं तेल भरून सगळ्या तेलाच्या पिंपात सगळं तेल ओतून पिंपाला बंद करून त्याने सगळ्या चाळीस चोरांना मारलं. ते सगळे मेले पण एवढ्या खराब मौत मेले कि त्यांच पूर्ण शरीर जळलं असे मरण मी कधीच बघितले नाही. असे करत करत हि सिरीयल पण संपली आणि सगळ्यांनी म्हटलं कि आता आपण अलिफ लैला पाहूया. अलिफ लैला हि एक सिरीयल आहे ज्यामध्ये अरब देशांमधल्या अलग अलग कहाण्या आहेत. अलिबाबाच्या शेवटी आमच्या घरचे सगळे जण वापस आले होते. अलीबाबा चालू असताना बाबांना दोन तीन सिरीयल आणखी आठवल्या जसे कि सर्कस, सिंहासन बत्तिशी, आणि भारत एक खोज पण त्यामधली सर्कस सिरीयल कोणालाच आवडली नाही. सिंहासन बत्तीशी चांगली सिरीयल आहे पण आम्ही आतापर्यंत ती सिरीयल पाहली नाही कारण कि आता आमच्या टीव्ही वर अलिफ लैला हि सिरीयल चालू होती. भारत एक खोज हि सिरीयल कोणालाच आवडली नाही खासकरून मला. अलिफलैला ह्या सिरीयल मध्ये अलीबाबा चाळीस चोर, सिंदबाद च्या सात सफरी आणि अलादिन का चिराग ह्या कहाण्या आहेत. आता आमची अलिफलैला हि सिरीयल चालू आहे आणि त्यामधली सिंदबादच्या सात सफरी हि कहाणी चालू आहे आता हि कहाणी पण संपत आली आहे.
लॉक डाउन मध्ये मी फक्त सिरीयलच नाही पाहल्या तर मी लिखाण पण केलं आणि माझे जे जुने लिखाण होते, त्यांना मी लॅपटॉपमध्ये टाईप केले, एडिट केले आणि ऑनलाईन मॅगझीन एडुकेशन मिरर मध्ये पब्लिश पन केले. जसे कि शिमला प्रवासाचा अनुभव, रॉकेट बनवत असतांनाचा मला आलेला अनुभव, मेरी नजर में से देखा हुआ अक्षरधाम मंदिर, आणि असे बरेच काही लेख. यांच्यातले काही यूट्यूबवर पण टाकले. पण फक्त एक लेख मी यूट्यूबवर नाही टाकला कारण कि तो खूप मोठा होता म्हणजे तो तीस मिनिटांचा होऊ शकला असता, तो लेख आहे शिमला का सफर. यानंतर पण माझं लिखाणाचं काम चालूच राहिलं आणि मी आता पण एक लिखाण लिहत आहे जे तुम्ही वाचत आहात.
माझे दिवस अश्या तऱ्हेनेच नाही जात होते तर माझे दिवस गेम खेळून पण जात होते. जर माझ्या समोर मोबाईल असला तर मी त्याला लपून लपून घेऊन खाली बसून खेळत होतो आणि म्युट करून खेळत होतो जर कोणी आवाज ऐकला तर मोबाईल घेऊन घेणार. मला मोबाईल मध्ये गेम लपून लपूनच खेळा लागत होते आणि तेही जास्त वेळ नाही. म्हणून मी बाबांसोबत एक समझोता केला, जर मी अर्धा तास वाचले किंवा लिहिले तर बाबा मला त्या वेळेच्या अर्ध्या वेळेपर्यंत मोबाईल खेळायला देणार. म्हणजे अर्ध्या तासाचे पंधरा मिनिट आणि एक तासाचा अर्धा वेळ अर्धा तास. यामुळे मला लपून खेळावं नाही लागलं. याने मला खूप फायदा झाला. मी जो गेम खेळतो तो फ्री फायर आहे आणि फ्री फायर मध्ये आपले खूप सारे दुश्मन असतात. ते आपल्याला गेम मध्ये मारून टाकतात आणि माझा याच्यात कसा फायदा होतो माहित आहे का? जर समजा माझा दुश्मन जर माझ्या पाठीमागे लपून आहे आणि तो मला गेम मध्ये मारायला येत आहे आणि जर तेव्हा आवाज म्युट असला तर मला त्याच्या चालण्याचा आवाज नाही येणार आणि तो मला मारून टाकणार. जर माझा आवाज म्युट नसणार तर मला त्याच्या चालण्याचा आवाज येऊन जाणार मग मी लपून जाणार आणि त्या दुश्मनला मारून टाकणार. मला लपून लपून नाही खेळण्याचा पण फायदा झाला. जस मी लपून खेळत आहे आणि मला घरात कोणी यायचा आवाज आला म्हणून मी तिथे लक्ष देऊन पाहतो आणि गेम मध्ये तसाच उभा आहे आणि जेव्हा मी गेम कडे पाहाल तर मला माहित पडलं कि मला कोणीतरी मारलं. जर मी खुल्यात खेळलो, जर मला खेळण्याची परवानगी आहे तर मला दुसऱ्या गोष्टीची पर्वा नाही राहत आणि मी पूर्ण लक्ष गेम मध्ये ठेवतो. मी आतापर्यंत असाच गेम खेळत आहे.
जेव्हा अलिफलैला हि सिरीयल चालूच झाली होती तेव्हा माझ्या शाळेची ऑनलाइन क्लास पण चालू झाली. मला तिथे अलग अलग क्राफ्टचे काम सांगत होते, आणि एकवेळा त्यानी सगळ्यांना एक एक फुल बनवून पाठवायला सांगितले मी एक फुल बनवून त्याचे फोटो पाठवले. मग बाबानी मला एक ओरिगामी चा बंडल आणून दिला आणि काहि कलर चे मोठे कागद. मी त्या ओरिगामी च्या कागदाचे फुल बनवले आणि मोठ्या कागदाचे फ्लॉवर पॉट बनवले. पण ते कागद संपले म्हणून मी एक वही शोधायला लागलो ती वही मला दिल्ली मधल्या शाळेत भेटली होती त्या वहीत सगळे पेजेस कलरचे होते मला तश्या दोन वह्या दिसल्या. मग मला आठवलं कि मला श्रीराम शाळेत पण अशी वही भेटली होती. ऑनलाईन क्लास मधे कोठीकर मॅडम नि मला कोरोना काळातील अनुभव लिहायला सांगितले होते, ते लिहायला मला बरोबर एक महिना लागला. आधी मी पेजवर लिहिले आणि मग स्वतः एडिट आणि टाईप केले. आता माझा ऑनलाइन क्लास चालू आहे जो मी आनंदाने करत आहे.
(डायरी के यह पन्ने इस मायने में बेहद ख़ास हैं क्योंकि इसे पाँचवीं कक्षा में पढ़ने वाले आरव गजेंद्र राउत ने लिखा है। वे एजुकेशन मिरर के सबसे नन्हे लेखक हैं। उनकी दो डायरी तब प्रकाशित हुई थीं, जब आप दूसरी कक्षा में ही पढ़ रहे थे। आरव हिन्दी के साथ-साथ मराठी भाषा में भी लिखते हैं। आरव को किताबें पढ़ने और नये-नये विचारों पर काम करने में काफी आनंद आता है। लॉक डाउन के दौरान उन्होंने विभिन्न सीरियल देखे और उनके बारे में अपने विचारों को लिखने की कोशिश की है।)
Khup chan aarav
Arav, superb writing.
God bless you beta
Very nice Aaraw 👌👌👌👌
Very good Aarav , It is very good piece of writing. Keep writing .Lots of blessings.
Very nice experience you wrote. Good keep it up.
Nice write up. Keep it up
आपका अनुभव पढके मुझे मेरे कोरोना वक्त के अनुभव याद आ गए.