Trending

शिक्षक प्रोत्साहन सिरीज़ः मला लाभलेले विविध शिक्षक

आरव राउत

आरव गजेन्द्र राउत एजुकेशन मिरर के नियमित लेखक हैं।

मी आतापर्यंत चार शाळा बदलल्या कारण जॉब मुळे माझ्या बाबांची शिफ्टिंग होत होती .माझी पहिली शाळा म्हणजे डोंबिवली महानगरपालिकेची बालवाडी.  तिथे मी खूप सुट्ट्या मारत होतो कारण मला  शाळेत जायला आवडत नव्हते तरीही  तिकडच्या  शिक्षिका मला रागवत नव्हत्या.  त्यावेळी मी खूप छोटा होतो यामुळे मला तिथले फार काही आठवत नाही.

त्यानंतर मी माणगावला राहायला गेलो.  तिथल्या शाळेचं नाव आदर्श मराठी प्राथमिक शाळा असे आहे. तिथे पण मी बालवाडीत होतो.  मला तिथले सगळ्यात जास्त आवडणारे शिक्षक म्हणजे गुरुजी , कारण जेव्हा पण मी वर्गात रडत   होतो तेव्हा ते मला वर्गाच्या बाहेर नेऊन एका झुल्यावर बसवून माझं रडणं शांत करून  शिकवत होते . ते शाळेच्या प्रिन्सिपलचे बाबा होते. ते एक वेळा  माझ्या माणगावच्या घरी आले तेव्हा मी खूप  खुश झालो, मी त्यांना इंग्रजीमधले 1, 2, 3 म्हणून दाखवले.  मी जानेवारी २०२० मध्ये जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा मी माझ्या पहिल्या शाळेला भेट दिली . तिकडचे शिक्षक म्हणत होते कि तू एक मोठा माणूस बनशील.  मग माझे बाबा आणि मी माणगावला माझ्या बाबांच्या मित्रा कडे  गेलो.

मला आठवलं कि इथे तर माझी शाळा आहे तर मी माझ्या शाळेत गेलो. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा तिथे तिळगुळ चा कार्यक्रम सुरु होता.  त्यांनी मला ओळखलं नाही तेव्हा मी म्हटलं कि मी इथे शिकलेलो आहे तरीही त्यांना आठवलं नाही, मग माझं नाव सांगितल्यावर त्यांनी ओळखलं आणि त्यांनी म्हटलं कि हा पहिलीत गेला काय?  माझे बाबा म्हणाले कि याला इथून जायला चार वर्ष झाले आता हा चौथीत गेला आहे,  त्यांनी हा प्रश्न विचारल्यावर मला शंका आली कि त्यांनी मला पूर्णपणे ओळखल नाही . गुरुजींनी मला शाळेत अभ्यास करायची  आणि वर्गात न रडण्याची  शिकवण दिली .

माझ्या बाबांनी २०१६ या वर्षी माणगावचा जॉब सोडला आणि दिल्लीला शिफ्ट झाले.  माझ्या बाबांनी  मला सेंट मॅथ्यूस पब्लिक स्कुल या शाळेत टाकले कारण ती शाळा  घराजवळ होती . त्या शाळेत मी तीन वर्षापर्यंत होतो . पहिल्या वर्षी  प्रेपमध्ये मला रजनी मॅडम होत्या त्या  खूप कठोर होत्या आणि खूप रागवत होत्या, त्यांनी एका वेळेस तर आम्हाला प्रिन्सिपल मॅडम कडेच न्यायचं ठरवलं, कारण मी आणि वर्गातल्या विद्यार्थ्यांनी बाहेरच्या बोर्ड वर चिपकवलेलें फुलं तोडले होते. जेव्हा मी एक वेळा रडलो होतो तेव्हा त्यांनी मला लाडानी शांत केले.

दुसऱ्या वर्षी मी फर्स्ट मध्ये  गेलो . अर्पिता मॅडम मला क्लास टीचर होत्या . त्या माझ्या पाठीमागच्या सोसायटी मध्ये राहत होत्या . मी कर्सिव्ह रायटिंग तेव्हाच शिकलो, त्यावेळी मी  क्लासमधे फर्स्ट येत होतो. त्या  मला जास्त रागवत  नव्हत्या कारण मी तेव्हा खोडकर  नव्हतो.  नंतर मी अंतिम परीक्षेत फर्स्ट आलो आणि दुसरीत गेलो.  मला वाटलं कि गीता मॅडम क्लास टीचर राहणार पण मॅडम तर बदलल्या होत्या.  आता आम्हाला अदिती मॅडम होत्या . त्या सगळ्यांना समान समजत होत्या.

त्या आम्हाला छान-छान गोष्टी सांगत होत्या आणि गेम पण खेळवत होत्या.  त्या म्हणत होत्या कि जर तुम्ही काम लवकर करणार तर तुम्हाला जास्त वेळ गेम खेळायला भेटणार.  माझ्या बाबांना स्वताःच काही  काम करायचं होतं म्हणून ते वापस अमरावतीला शिफ्ट झाले,  एक घर बनवलं आणि मला श्रीराम प्राथमिक शाळेत दाखल केलं, माझी ऍडमिशन डायरेक्ट चौथीत केली.  चौथ्या वर्गाला शिकवायला टाले सर होते . सर आम्हाला नेहमी हसवत-हसवत शिकवतात  आणि आम्हाला तें  खूप वेळा काडीने  मारत होते पण त्यांचा  मार आम्हाला कधी लागलाच नाही कारण ते आम्हाला खूप हळू मारत होते.  असे मला आतापर्यंत विविध शिक्षक भेटले.

(एजुकेशन मिरर के फ़ेसबुक पेज़ और ट्विटर हैंडल  से जुड़ सकते हैं। इसके साथ ही साथ वीडियो कंटेंट व स्टोरी के लिए एजुकेशन मिरर के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करने के लिए यहां क्लिक करें। आप भी एजुकेशन मिरर के लिए अपने लेख educationmirrors@gmail.com पर भेज सकते हैं। )

11 Comments on शिक्षक प्रोत्साहन सिरीज़ः मला लाभलेले विविध शिक्षक

 1. shruti Marotrao Tupat // September 5, 2020 at 12:22 pm //

  खुप छान आरव.

 2. Good Aarav. Keep it up.

 3. Ashwini tupat // May 11, 2020 at 2:02 pm //

  Khup chan aarav

 4. Anonymous // May 10, 2020 at 10:02 am //

  Arav very nice. I should salute you for such an honest writing.

 5. Anil Raut // May 10, 2020 at 8:31 am //

  Nice attempt. Keep it up

 6. sanjana sao // May 10, 2020 at 5:35 am //

  Khup chan anubhv lihilet itky lahan vayat itke chan chan lekh lihitos mala nahi mahit tula mothe houn kay banayche ahe pan je pan banshil ty sobt changla lekhk nkki banshil manun lihan chalu thev best of luck

 7. Anonymous // May 10, 2020 at 5:12 am //

  Khup chan lihile 4 class paryant vegvegli school v vegvegle teachers cha tuza anubhav chan ahe asach shikt raha lihit raha best of luck for your future

 8. रमेश साव // May 10, 2020 at 4:35 am //

  आरव च्या वयाचा विचार करता खूप साऱ्या गोष्टी त्याला आठवतात बालवाडी ते 4 त्या वर्गापर्यंत आठवणी त्यात ल्या त्यात शिक्षक आणि शिक्षण बद्धल असणारी गोडी या बद्धल अभिनंदन करावेच लागणार भविष्यात अशीच लिहिण्याची आवड असू दे शुभेच्छा तुला

 9. Sagar shitole // May 10, 2020 at 3:25 am //

  डोंबिवली ते अमरावती शालेय प्रवास् ।।।
  Khup sundar ritya athavani mandalya ahet mast

 10. Amol Ashokrao Rode // May 10, 2020 at 2:01 am //

  Khup chan Aarav…keep it up!!!🤗

 11. Anonymous // May 10, 2020 at 2:01 am //

  Good to know about your experiences of various teacher’s

इस लेख के बारे में अपनी टिप्पणी लिखें

%d bloggers like this: