शिक्षक प्रोत्साहन सिरीजः मला प्रेरणा देणारे शिक्षक

sanjana-nमला माझ्या आई बाबांनी लहानपणी शाळेत टाकले . तुम्ही म्हणणार  यात वेगळं काय आहे ?  सर्वांचेच  आई बाबा टाकतात ,शाळा म्हणजे पहिली ते दहावी पर्यंतचा प्रवास व नंतर कॉलेज.  त्यामध्ये विशेष काय.  पण खरं तर शाळा व कॉलेज मुळे माझ्या जीवनावर खूप प्रभाव पडला.  शिक्षणच नव्हे तर माझ्यावर चांगले संस्कार सुद्धा घडलेत त्याचे कारण म्हणजे मला लाभलेले माझे शिक्षक व शिक्षिका.

मला अजूनपण आठवते मी पहिली ते चौथीपर्यंत ज्या शाळेत होती त्याच्या शिक्षिका आमलेकर मॅडम होत्या.  त्या मी तिसरीत होती तेव्हाच रिटायर झाल्या होत्या पण आमचं चौथीच वर्ष वाया न जावं म्हणून त्यांनी रिटायरमेंट एक वर्ष पुढे ढकलले  त्यामुळे मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. नंतर माझा समर्थ हायस्कुल मध्ये नंबर लागला.

पाचवी ते दहावी पर्यंत मी त्या शाळेत शिकली.  पाचवी ते दहावी पर्यंत प्रत्येक तासाला अलग अलग शिक्षक शिकवितात तुम्ही म्हणणार  यात काय विशेष सर्वांनाच शिकवितात.  पण माझ्या आयुष्यात अनेक शिक्षक येऊन गेलेत पण जो प्रभाव व जे संस्कार  माझ्यावर झाले त्यामध्ये काही अश्या शिक्षकांचा सहयोग आहे ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही पहिल्या आमच्या चौथी पर्यंतच्या शिक्षिका आमलेकर मॅडम ,दुसरे आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षक पाठक सर , व तिसरे म्हणजेच कॉलेजचे अकरावी ते बीकॉम  थर्ड इयर पर्यंत शिकवणारे मोहोड सर त्यांच्याबद्दल मी पुढे सांगणारं.

सध्या पाठक सरांवर येऊया. पाठक सर आठवी  ते दहावीपर्यंत शिकवीत होते गणिताच्या तासाला सर्व विद्यार्थी इतके शांत असत कि कोणाची पेन्सिलसुद्धा पडली कि पूर्ण वर्गात आवाज होत असे इतके कडक पण दयाळू होते ते सर . ते सर मला नेहमी म्हणायचे कि तुझ्या कडून काहीच नाही होत . पण त्या मागचा उद्देश हा होता कि मी प्रयत्न करीत राहली कि सर्व काही करू शकते.  ते म्हणाले कि मी सर्व  विध्यार्थ्यांना समान मानतो पण ज्यांना रागावतो त्यांना मी यासाठी रागावतो कि त्यांनी न थांबता न घाबरता पुढे जाण्याचा प्रयत्न  करावा.  कमजोर विद्यार्थी नसतो  जर त्याला घडवणारे शिक्षक चांगले असेल तर विद्यार्थी नक्कीच चांगला घडतो.  त्या वयात असताना मला ते सर आवडत  नसे खूप कडक व अनुशासन पाळणारे  होते ते नेहमी रागवायचे पण भेदभाव करायचे नाही.  एकदा तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला देखील शिक्षा  केली तो पण आमच्याच वर्गात शिकत असे, मला तेव्हा त्यांचे महत्व समजले नाही पण जेव्हा त्यांच्यापासून दूर गेली व दहावी संपल्यानंतर त्यांचे महत्व समजले, म्हणतात ना  की  कोणी दूर गेल्याशिवाय आपल्याला त्याची किंमत कळत नसते तसेच झाले.  पुढे कधी मी यशस्वी झाली तर त्यांच्या भेटीला नक्की जाणार ते सर नेहमी म्हणायचे कि, ‘’माझा विद्यार्थी जेव्हा मोठा होऊन नोकरीवर लागून किंवा  यशस्वी होऊन माझं तोंड मिठाईने गोड करतो तेव्हाच मला खरी गुरुदक्षिणा मिळेल व खूप आनंद होईल’’ शक्य झाले तर मीपण जाणार मिठाईचा डब्बा  घेऊन त्यांच्याकडे.

नंतर मला दहावीत ७१% मिळाले व पुढे नरस्समा कॉलेजमध्ये  कॉमर्सला  ऍडमिशन घेतली तिथे जाऊन माझ्यावर खऱ्या अर्थाने संस्काराची व जगाला ओळखण्याची सुरुवात झाली.  आठवते मला ते  दिवस जेव्हा माझा   कॉलेजचा पहिला दिवस होता तेव्हा तिकडचे  सर आणि मॅडम यांची ओळख झाली. मला विचारलेला मोहोड सरांचा पहिला प्रश्न होता कि तू कॉमर्स क्षेत्र का निवडले? तुला पुढे काय करायचे आहे ? तेव्हा मला माहित नव्हते . सायन्स  कठीण होते म्हणून सायन्स घेतले  नाही ,आर्ट खूप सोपी होते म्हणून आर्ट घेतले  नाही, मग राहले काय कॉमर्स च  !! म्हणून कॉमर्स घेतले.  पण खरतर पुढे काय करायचे याचे उत्तर शोधण्यासाठी कॉमर्स  घेतलं असावं. आमचे मोहोड सर विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर ते पण आम्हा विद्यार्थ्यांचा खूप लाड करीत. नेहमी चांगल्या गोष्टी शिकवीत. आमचे मोहोड सर छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भक्त, शिवजयंतीचा कार्यक्रम नेहमी धूम धामात  करीत. ते नेहमी शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगीत असे.

मी पण इतकी प्रभावित झाली कि मी  शिवाजी महाराजांवर प्रेम करायला लागली.  नेहमी शिवजयंती निमित्त्याने मी भाषण देत असे. अरे !!! भाषणावरूनच मला एक गोष्ट आठवली, मी या आधी कधीच  भाषण नव्हते  दिले व कदाचित देऊ पण शकली नसती जर मोहोड सरांसारखे सर मला लाभले नसते . ते नेहमी म्हणायचे कि प्रयत्न केल्याने सर्व काही होऊ शकते ते आमच्या  कॉमर्स विध्यार्थ्यांसाठी कॉमर्स वीक ठेवीत त्यात वेगवेगळे गेम स्पर्धा व तसेच वादविवाद स्पर्धा व स्पीच कॉम्पीटिशन राहत. त्यात मी पहिल्यांदा स्पीच दिली तेव्हा मला खूप भीती वाटली पण ती स्पीच  बरोबर नाही आली . सरांनी म्हटले कि छान जमली आणखी प्रयत्न करशील व नंतर पुढच्या कार्यक्रमात देशील.  नंतर मी शिवजयंतीला भाषण दिले तेव्हा पूर्ण वर्गासमोर सरांनी माझे कौतुक केले व तेव्हा मला वाटले कि, नाही मी पण छान  स्पीच देऊ शकते. सरांनी कधीही कोणत्या विद्यार्थ्याला  रोकटोक केली नाही.  नेहमी उत्साह वाढविला. जी मुलगी कधी दहा लोकांसमोर सुद्धा बोलू नव्हती शकत ती शिवजयंती , कॉमर्स वीक व अन्य कार्यक्रमात भाषण देते याचे पूर्ण पूर्ण श्रेय माझे गुरुजी मोहोड सरांना जाते .

एकदा आमचा वर्ग NCC च्या  विद्यार्थांनी घेतला तर सरांनी आम्हाला कॉलेज समोरच्या राम मंदिरात व एकदा स्टाफरूममध्ये शिकवले ते म्हणायचे कि, शिकणारा विद्यार्थी कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत शिकतो फक्त त्याला शिकण्याची आवड असली पाहिजे. अशा अनेक चांगल्या गोष्टी ज्या पुस्तकाच्या पलीकडेपण शिकण्यासारख्या  आहे ते सर्व आम्हाला शिकवीत असे . माझ्या जीवनावर चांगले संस्कार हे शाळा व कॉलेजमधील शिक्षकांमुळेच घडलेत.  म्हणतात ना  कि शाळेत टाकल्या पासून विद्यार्थी  हा घरी कमी आणि  शाळेत व कॉलेज मध्ये जास्त तास राहतो म्हणून त्याच्यावर होणाऱ्या संस्कारांच्या मागे चांगले गुरु व चांगल्या संगतीचा जास्त प्रभाव पडतो असाच काहीसा प्रभाव माझ्या जीवनावर देखील पडला आहे.  फक्त आईवडिलचं  नाही तर शिक्षकांचाही एका विद्यार्थ्याला  घडविण्यात  खूप मोठा हात असतो.  शाळा व कॉलेज हे फक्त भविष्यात आपल्याला चांगली नोकरी व चांगली डिग्री मिळावी म्हणून शिकवीत नसते तर पुढे येणाऱ्या प्रत्येक विपरीत परिस्थितीला सामोरे जायला व जीवनात यशस्वी व्हायला शिकवित .

( लेखक परिचयः कु संजना रमेशराव साव, बी कॉम २, नरसम्मा हिरय्या आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , अमरावती , महाराष्ट्र।)

आप एजुकेशन मिरर को फ़ेसबुक, ट्विटर और इंस्टाग्राम पर भी फ़ॉलो कर सकते हैं। वीडियो कंटेंट व स्टोरी के लिए एजुकेशन मिरर के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करने के लिए यहां क्लिक करें। )

 

12 Comments

 1. Fantastic Sanjana

 2. İt has been realy creative and amazine keep it sanjna next time more impresive expect from you

 3. Sanjana lihilelya lekhamadhe teacher baddhal keleli tipni khup changali madali kharokhar teacher baddhall athavan thevane hich tyanchi til matra guru dakshna mannyas harkat nahi carry on🙏🙏

 4. KHUP Chan lihile sanjana tu. Keep it up.

 5. मीना Pagrut May 7, 2020 at 11:49 am

  Sanjana लेख अप्रतिम आहे Teacher करिता तुझा अभिप्राय खूप छान व्यक्त केलास आणि मला स्वतः मध्ये डोकावायला संधी मिळाली

 6. shruti Marotrao Tupat May 7, 2020 at 10:52 am

  तुझा लेख वाचून मला माझ्या शिक्षकाची आठवण आली. खरच खुप मोलाचा वाटा असतो त्यांचा,
  शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात.
  शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही.

 7. Vijay Anasane May 7, 2020 at 10:06 am

  संजना तू स्वतः व तुझे शिक्षण या दोन गोष्टीला दुआ असलेले यशस्वी शिक्षक आई वडील यांच्या बद्दल तु जे
  कृतज्ञाता व्यक्त केली हा विद्यार्थीनी म्हणून तुझा मोठेपणा। त्याबद्दल तुझे आभार, धन्यवाद, अभिनंदन
  आणि या पुढील तुझी वाटचाल यशस्वी पणे चालू राहील व तू यशस्वी होशील यात तीळ मात्र शंका नसून खात्री आहे त्याबद्दल तुला यशस्वी वाटचाली साठी आमचा आशीर्वाद व शुभेच्छा
  विजय, मीनाक्षी, केतकी अनासाने।🙏🙏

 8. संजना तू स्वतः व तुझे शिक्षण या दोन गोष्टीला दुआ असलेले यशस्वी शिक्षक आई वडील यांच्या बद्दल तु जे
  कृतज्ञाता व्यक्त केली हा विद्यार्थीनी म्हणून तुझा मोठेपणा। त्याबद्दल तुझे आभार, धन्यवाद, अभिनंदन
  आणि या पुढील तुझी वाटचाल यशस्वी पणे चालू राहील व तू यशस्वी होशील यात तीळ मात्र शंका नसून खात्री आहे त्याबद्दल तुला यशस्वी वाटचाली साठी आमचा आशीर्वाद व शुभेच्छा
  विजय, मीनाक्षी, केतकी अनासाने।🙏🙏

 9. Khup chan lihile

 10. रमेश साव May 7, 2020 at 8:45 am

  सुरुवात चांगली केली असेच प्रयत्न करीत राहा अजून शालेय अनुभव टाकण्याची मला गरज वाटते ठीक आहे प्रयत्न ना शी परमेश्वर

 11. Gajendra Raut May 7, 2020 at 7:56 am

  शिक्षकांबद्दल तुझे विचार वाचून खुप छान वाटलं. शिक्षकांचा विद्यार्थी घडवण्यामध्ये मोलाचा वाटा असतो हे सर्वविदित सत्य आहे. असेच लिहित जा विविध विषयावर.

 12. Tuza lekh vachun mala khup chan vatle
  Keep your process

इस लेख के बारे में अपनी टिप्पणी लिखें

%d bloggers like this: