Trending

आरव की डायरीः आनंद मेळाव्यातील माझे अविस्मरणीय अनुभव

एजुकेशन मिरर के सजग पाठकों के लिए आरव कि डायरी का चौथा पुष्प सादर प्रेषित है। डायरी के इन पन्नों में आरव ने स्कुल मे हुए आनंद मेळावा के अपने अविस्मरणीय अनुभवों के बारे मे लिखा है। डायरी के पन्ने इस लिहाज से भी महत्वपूर्ण है क्योंकि यह परिणाम हैं किताबो से  भारी लगाव का, तमाम पुस्तके पढ़ने के बाद आरव मे यह क्षमताए विकसित हुई हैं।

पढ़िए: आरव की पहली डायरीः दिल्ली के चिड़ियाघर की सैर

अलग-अलग किताबें पढ़ने से उसकी सोच का दायरा विस्तृत हुआ है। जो इस डायरी के इन पन्नो को पढ़ते हुए महसूस किया जा सकता है। किताबे पढ़ने का सीधा असर भाषायी क्षमतायें विकसित होने पर होता है। यह डायरी और आरव का लेखन इसका यह एक जीता-जागता उदाहरण है। ग़ौर करने वाली बात है कि इस बार आरव ने खुद ही अपनी डायरी टाईप की है, उसे एडिट किया और इलस्ट्रेशन भी खुद ही बनाये हैं।  डायरी के इन पन्नो को चौथी कक्षा में पढ़ने वाले आरव राउत ने लिखा है। वे एजुकेशन मिरर के सबसे नन्हे लेखक हैं। उनकी तीन डायरी अब तक प्रकाशित हुई है.  दिल्ली से अमरावती आने के बाद आरव मराठी भाषा मे लिखने लगे, शुरु मे उन्हे समस्या आयी , लेकिन मराठी मातृभाषा होणे के कारण यह समस्या जल्दी ही पार भी हो गयी।

आरव की डायरी

उद्या आमच्या शाळेत (श्रीराम प्राथमिक शाळा, अमरावती) आनंद मेळावा आहे असे मी विचार करत – करत खेळायला गेलो. खेळून वापस आल्यानंतर  मला वाटलं कि मी एक गेम चा स्टॉल लावू शकतो.  मला आठवलं कि आज सकाळी सरांनी सगळ्यांना सांगितले होते कि आपण उद्या कोणत्याही प्रकारचा स्टॉल लावू शकतो  तेव्हाच मला एक युक्ती सुचली.   माझ्या बाबांच्या ट्युशनमध्ये एक मुलगी शिकते तिचे नाव आनंदी.  जेव्हा मी बाहेर खेळायला गेलो होतो तेव्हा ती ट्युशनमध्ये आली होती, तिने कागदाचे तीन कप आणले होते. त्यावेळी माझा दादा देवप्रियन तिथे होता, आनंदीने  ते कप तिथेच  ठेवले.  मग दादा ने   ते कप खाली आणले यावरून मला युक्ती आली.   पण माझ्याकडे होते तीन कप ते  पण छोटे.  मी आईला विचारले कि मला कप पाहिजे, आईने सांगितले कि तुझा मित्र पुष्कर आहे ना त्याच्याकडे असे खूप कप आहे, महालक्ष्मी च्या वेळेस आणले होते.  मी पुष्कर च्या घरी गेलो आणि पंधरा कप आणले होते.  मग मी विचारात पडलो, मी दादाला विचारलं कि आनंदीने ते कप आणून त्याचे काय केले? त्याने  सांगितले कि आनंदीने एका कपाखाली  वस्तू ठेवली, ते कप  इकडचे -तिकडे, तिकडचे -इकडे  केले आणि जे हा गेम खेळले त्यांना म्हटलं, कि आता शोधा ती वस्तू कोणत्या कपात आहे?

मला वस्तू पण मिळाली, जे कपं मी पुष्कर जवळून  आणले होते ते मोठे होते म्हणून मी आनंदीचेच  कप मोठ्या कपांच्या खाली ठेवायला घेतले.  जेवनाच्या वेळेस माझे बाबा बोलले कि तुला या गेमवर  रूल बनवावे लागणार,   मी म्हटलं कि कोणते रुल?  बाबा म्हणाले कि थांब, मी तुला माझं  जेवन झाल्यावर सांगतो.  मग मी बाबा जवळ आलो . बाबांनी मला पहिला रुल सांगितला – पाच रुपय दया दहा रुपय जिंका.   दुसरा रूल सांगितला जर कोणी  एकही ओळखू शकला नाही तर त्याला चार रुपये वापस. मग मी झोपलो.

सकाळ झाल्यावर मला आईने ७:०० वाजता उठवले ,  मला तेव्हा खूप झोप येत होती, म्हणून मी आईला सांगितलं कि अर्ध्या तासानंतर उठवशील, पण आईने म्हटलं कि  ७:३० वाजता तर तुझी शाळा आहे.  अरे तू शाळेची डायरी वाचली नाही काय ? आई म्हणाली नाही,  मी म्हटलं डायरीमध्ये लिहिलं आहे कि जे मूल स्टॉल लावणार आहे ते  ९:०० वाजे पर्यंत येऊ शकतात . मग मी सकाळी ७.३० वाजता  उठलो.  मी सगळी तयारी  केली.  आईने मला चिल्लर चाल्ल्लर   ५० रु दिले. आजीने मला पैसे ठेवायसाठी एक डब्बी दिली.  मी आठ वाजता शाळेत जाण्यासाठी निघालो . रस्त्यात मला आठवलं कि मी रुमाल सोबत घेतला नाही.  मला आनंदी सारखे ते कपं  इकडचे -तिकडे, तिकडचे -इकडे करायला अवघड जात होते म्हणून त्या कपांना झाकन्यासाठी मला रुमाल हवा होता. मी आईला विचारला कि तू मला दुप्पट देशील काय?  शाळेत गेल्यावर देतो असे आईने म्हटले.

मी शाळेत पोहचलो. आईने मला दुप्पटटा  दिला . मला वाटले कि परिपाठ संपला असणार पण तो तर आताही चालूच होता.  मी वर्गात बॅग ठेवली आणि पैसे मोजले आणि बॅगच्या बाहेरच पैशाची डब्बी ठेवली.  मी परिपाठात बसलो  आणि मला एकदम आठवण आली कि डब्बी बॅगच्या  बाहेर आहे, म्हणून मी   वर्गात वापस गेलो आणि पैशांची डब्बी बॅग मधे ठेवली. परिपाठ झाल्यानंतर आम्ही वर्गात आलो. वर्गात आल्यानंतर मी दोन पार्टनर पण बनवले त्या दोघांच नाव आहे जय आणि जितू . मी सगळ्यांना तो गेम खेळायला  लावला.   जेव्हा  जेवायची बेल  झाली तेव्हा मी खिचडीची प्लेट तर आणली होती,  पण मी त्यामधे खिचडीचं घेतली नाही.  मी सरांना खोटं खोटं  सांगितलं  कि मी जेवलो, निस्ताने  सरांनी मला आणि जे जेवले नाही आणि ज्यांचं जेवण झालं त्यांना आवाज दिला . निस्ताने सर बोलले कि आता आपल्या क्लासच्या अंदरचे डेस्क कॉर्नर कॉर्नर ला लावा.  खूप जणांनी सुरवातीला बेंच आणले पण आम्ही नाही आणला म्हणून खुशालने आम्हाला बसायला बेंच दिला .आपण काल  बोललो होतो कि ९.००  वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला  स्टॉल लावून देणार आहे.  त्यानंतर आम्ही सरस्वती पूजन केले. वाकोडे मॅडम आणि काही मुलांनी छोटे छोटे गाणे म्हटले.  हे  झाल्यावर सरांनी सोनेरी आणि चंदेरी रंगाचा एक माईक आणला. सर बोलले कि सगळ्यांनी एक एक स्टॉल लावा.  असे बोलून आनंद मेळावा सुरु झाला.

सगळ्यांनी आपापले खायचे किंवा खेळायचे सामान बाहेर आणले . वाकोडे मॅडम म्हणाल्या ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावलेला नाही ते सगळेजण सर्वांच्या मधात बसा , मी तुम्हाला सांगते कि या आनंद मेळाव्यात कोणते – कोणते दुकान भरले आहे . चला आता तुम्ही शांततेने ऐका. पहिला नंबर आलूपोंग्याच दुकान ,  दुसरे  पण आलूपोंग्याच दुकान जे  सुशांतचे होते, तिसरा नंबर पण आलूपोंग्याच दुकान जे आनंदीचे (रिसोळकर) होते,  चौथ्या  नंबरचे दुकान होते थंड्या-थंड्या  ज्यूस चे जे कार्तिकचे होते, आणि पाचवा होता गेमचा स्टॉल  म्हणजे माझा स्टॉल आणि सहावा होता  कच्चा चिवड्याचा स्टॉल जो खुषालचा होता. या व्यतिरिक्त खूप सारे स्टॉल होते ते मला आठवत नाही.

माहिती सांगताना सर्वप्रथम माझा गेम वाकोडे मॅडम खेळल्या. आम्हाला खूप आनंद झाला कारण वाकोडे मॅडम त्यामधे हरल्या होत्या आणि आमचा एक रुपयाचा नफा पण झाला होता. सगळयांच्या  स्टॉल वर खूप गर्दी झाली , मग आमच्या स्टॉलवर श्रवण आला त्याने मला पाच रुपय दिले आणि त्याने दोन डावांमध्ये दोनीही छोटे कप शोधले म्हणून मला त्याला दहा रुपये दयावे  लागले.  असे करत करत तर  माझे सगळेच पैसे संपून जाणार असा मी विचार केला, यामुळे जे पहिले बाबाचे रूल  होते त्या रुलांवर मी चाललोच नाही.  पहिला रुल होता पाच रुपय द्या दहा रुपये  जिंका याला बदलवून मी-पाच रुपये दया आणि जर तुम्ही दोन्हीही छोटे कप शोधले तर तुम्हाला तुमचे पाच रुपये  वापस.  दुसरा रुल होता  तुम्ही एक छोटा कप शोधू नाही शकले किंवा दोन्ही छोटे कप शोधू  नाही शकले  तर तुम्हाला तुमचे चार रुपये वापस  त्याला बदलवून मी त्याला केलं तुम्ही एक छोटा कप शोधू नाही शकले किंवा दोन्ही छोटे कप शोधू  नाही शकले  तर तुम्हाला तुमचे फक्त तीन रुपये वापस,  कारण त्याने  २ रु चा  नफा होतो. माझ्या शेजारील  दुकानाचा मालक खुशाल, त्याचा चिवड्याचा धंदा चालत नव्हता तर टाले  सरांनी माझ्या कडून पाच कप भाड्याने घेतले आणि मी म्हटले कि आनंद मेळा संपल्यावर खुशाल मला पाच रुपये देणार.

सरांनी  त्याला एक गेम सांगितला तो होता- २ रु ची एक बारी, एका मिनिटात जो एकमेकांवर कप ठेऊन पिरॅमिड बनवू शकणार त्याला पाच रु बक्षीस यामुळे त्याच्याजवळ थोडीशी गर्दी जमा झाली. त्याच्या थोड्याच  वेळानंतर सरांनी मला एक आवाज दिला आणि बोलले तुझ्याकडे आणखीन पाच कप आहे ते मला दे, नंतर वापस करतो. मी पाच कप सरांना दिले. एका मुलानं मला फाटलेली  दहाची नोट दिली. मग मी सरांजवळ गेलो. पण माझ्या बाजूचा एकही मुलगा मला त्याची दुसरी नोट देत नव्हता म्हणून मी सरांपाशी त्यांचा गेम खेळायला गेलो. त्यांचा गेम असा होता कि त्यांनी एका पहाडासारखा कपांचा शेप बनवला आणि त्याला एका गोलापासून मारायचं  होतं  एका वेळेस सगळे कप पडले पाहिजे दोन रु बक्षीस.  एक रुपयाची एक चान्स. तर मी सरांना दहा रु दिले .

मग सर बोलत होते हा आमचा सगळ्यात मोठा गिऱ्हाईक आहे याने दहा रु दिले याला पहिले खेळू द्या. आता माझ्याकडे दहा चान्स होते, सगळ्या  चान्स मध्ये एकच कप पडायचा राहत होता. एका चान्समध्ये सगळे कप पडणे नामूमकिन नाही तर काय आहे!!! पण जास्त कमाई  गेम वाल्यांचीच झाली कारण आनंद मेळावा भरला होता जेवण झाल्यानंतर तर तुम्हीच सांगा कि ते गेम खेळणार कि आणखीन जेवणार?  मग सगळ्यांनी आपापले दुकान बंद केले.  टाले सर माझ्याकडे आले. सरांनी मला पहिले पाच रुपये दिले, त्यांनी एकच कप शोधला म्हणून माझा एक रुपयाचा नफा झाला.  दुसऱ्या डावात सरांनी दोन्हीही कप शोधले म्हणून माझा एकहि रुपयाचा नफा झाला नाही.

आरव की तीसरी डायरीः शैक्षणिक सहल फन अँड फूड पार्क, नागपूर

मला सरांची शोधण्याची ट्रिक समजलीच नाही.  नंतर मीपण दुकान बंद केले कारण सगळी दुकानं  बंद झाली होती आणि एकही गिऱ्हाईक नव्हता.  सगळी मुलं  क्लासमध्ये डान्स करायला गेली होती. मी डान्स करायला अंदर गेलोच नाही. जो सकाळी मीआईला दुपट्टा मागितला होता त्याचं काही कामचं पडलं  नाही  कारण  मी सगळ्यांना बोललो कि तुमच तोंड पाठीमागे करा. असं  करून आनंदमेळावा संपला. त्यानंतर सुट्टी झाली. माझा दादा गाडी ने घ्यायला आला . मला आनंदमेळ्याव्याच्या आदल्या दिवशी वाटत होते  कि माझ्याकडे एकही गिऱ्हाईक येणार नाही पण शाळेत आल्यानंतर त्याचं  उलटं झालं. त्या दिवशी माझी ७० रुपयांच्या वरती कमाई झाली. माझ्या दोन पार्टनरांना मी पाच – पाच रुपय दिले.असे माझे आनंदमेळाव्याचे अविस्मरणीय अनुभव . [ हा आनंदमेळावा २० नोव्हेम्बर २०१९ रोजी श्रीराम प्राथमिक शाळा, येथे  संपन्न झाला होता।

(डायरी के यह पन्ने इस मायने में बेहद ख़ास हैं क्योंकि इसे चौथी कक्षा में पढ़ने वाले आरव गजेंद्र राउत ने लिखा है। वे एजुकेशन मिरर के सबसे नन्हे लेखक हैं। उनकी दो डायरी जब प्रकाशित हुई थीं, तब वे दूसरी कक्षा में ही पढ़ रहे थे। अभी हिन्दी से मराठी भाषा में लेखन का नयापन महसूस करिए आरव की डायरी में।)

 

6 Comments on आरव की डायरीः आनंद मेळाव्यातील माझे अविस्मरणीय अनुभव

 1. Anonymous // July 19, 2020 at 7:01 pm //

  आरव सरस्वती विद्यालय मध्ये तुझे स्वागत.तू अप्रतिम लिहीतो.कायम लिहीत रहा.

 2. मनोहर // April 27, 2020 at 9:00 am //

  वाह!

 3. मीना नगराळे // April 26, 2020 at 11:22 am //

  खुप छान आरव

 4. shruti Tupat // April 25, 2020 at 5:15 pm //

  khup chan aarav… tu jya chotya chotya goshti explain krto… tya mule vachayla ek veglach aand vatto… asch liht raha… all the best…

 5. Anil Raut // April 25, 2020 at 8:27 am //

  NICE description of the – event. Keep it up.

 6. Amo A Rode // April 24, 2020 at 4:00 pm //

  Aarav…tuzhe lekhan khup surekh ahe.Tu atantya changlya prakare vishay mandtiy.Asech lihit raha amhi sagale tuzhe lekhan khup chan prakare enjoy karto..Keep it up Beta..All the best…

इस लेख के बारे में अपनी टिप्पणी लिखें

%d bloggers like this: