Trending

“समतेचे घोषकार आंबेडकर” पुस्तकाचा आढावा

ambedkarमी या आधी शामची आई ,गांधी हत्या आणि मी, न संपणारी वाट अशी अनेक पुस्तके वाचलीत पण डॉ आंबेडकरांचे पुस्तक वाचल्यावर एक वेगळाच अनुभव आला .मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव “समतेचे घोषकार आंबेडकर” असे आहे . पुस्तकाचे लेखक वसंत मून आहेत, चित्रकार दीपक मैत्रा व संक्षिप्तीकरण केले आहे सुषमा सोनक यांनी. हे पुस्तक १०२ पानाचे असून याची किंमत फक्त ३० रु आहे. हे पुस्तक एन बी टी ने प्रकाशित केले आहे . पुस्तकाच्या प्रत्येक पाठा मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण चरित्र व त्यांनी केलेल्या कार्या बद्दल सुरेखपणे वर्णन केले आहे. डॉ आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे . डॉ आंबेडकरांच्या प्रत्येक वयोगटातील कार्याला सविस्तर व अनुक्रमाने मांडले आहे.

मी या आधी डॉ आंबेडकरांचे पुस्तक वाचले नव्हते. असे म्हणता येणार कि मला डॉ आंबेडकरांबद्दल व त्यांच्या कार्या बद्दल काहीच माहित नव्हते व मला वाचायला पण आवडत नसे. मामा म्हणाले कि तू एकदा पुस्तक वाचून तर बघ कदाचित तुला आवडेल. मूड नसतांना देखील मी ते पुस्तक वाचायला बसली. मी डॉ आंबेडकरांचे बालपण वाचले. लहान वयात अस्पृश्य म्हणून त्यांनी सहन केलेल्या यातना व त्यातून निघण्यासाठी शिक्षण घेण्याची त्यांची धडपड. लहानपणीच त्यांना झालेली त्यांच्या कर्तव्याची जाणीव . चवदार तळ्याचे सत्याग्रह ,मनुस्मृतीचे दहन ,येवला परिषद ;धर्मांतराची घोषणा , केंद्रीय मजूर मंत्रिपद ,दीक्षा समारंभ असे अनेक पाठ वाचले, मला हे पुस्तक खूप आवडले आणि त्यांच्या बद्दल खूप काही जाणून घेण्याची इच्छा व उत्साह माझ्या मनात निर्माण झाला.

fb_img_15868438666754817191749502679168.jpg

बाबा साहेब भीमराव आंबेडकर का यह स्केच निधिन शोभना ने बनाया है। (नोटः यह इस किताब का हिस्सा नहीं है।)

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपण आता जो आदर , मान , सन्मान देतो तो पूर्वी त्यांना मिळत नसे. पुस्तकातील एका प्रसंगाने तर मला हादरून सोडले. बडोदा शहरात नोकरी साठी गेलेल्या डॉ आंबेडकरांना राहण्यासाठी भाड्याने खोली सुद्धा मिळत नसे. जात सांगताच त्यांना हाकलुन दिले जात असे. मिलिटरी सचिव हे पद त्या वेळेस मोठे मानले जात होते. इतके मोठे पद मिळून सुद्धा केवळ अस्पृश्य जातीचे आहे म्हणून तेथील कारकून आणि शिपाई त्यांच्याकडे दुरूनच फाईल फेकत असत. ते उठून गेल्यावर खालची चटई देखील नेऊन स्वच्छ करीत. पिण्या करिता ऑफिस मध्ये पाणी पण मिळत नसे . तरीही त्यांनी धीर सोडला नाही प्रयत्न सुरूच ठेवले.

CamScanner 05-11-2020 16.16.01_2

कारकून आणि शिपाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दुरूनच फाईल फेकत असताना

आजचा विद्यार्थी हा मौजमजा व मोबाईल तसेच इतर गोष्टी मध्ये जास्त वेळ वाया घालवतो व एक डिग्री मिळवतो. त्या वयात आंबेडकरांनी एकापेक्षा जास्त डिग्री प्राप्त केलीत. आपण नोकरी मिळाली कि अभ्यास करणे सोडून देतो पण आंबेडकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत वाचन लिखाण सुरूच ठेवले. इतकी मेहनत करणारा महानायक कदाचित एकदाच जन्माला येतो. आपण अभ्यास करून इतके काहीं करू शकतो हे मला डॉ आंबेडकरांचे पुस्तक वाचून माहित पडले. डॉ आंबेडकरांनी शिक्षणाला शस्त्राप्रमाणे वापरले व अस्पृश्याना हक्क, जमीन व धर्म मिळवून दिला. शिक्षण हे शस्त्र आहे , तपस्या आहे, प्रार्थना आहे हे डॉ आंबेडकरांनी सिद्ध केले हे पुस्तक शिक्षण घेत असलेल्या किंवा ज्यांना डॉ आंबेडकर माहित नाही त्यांनी नक्की वाचायला पाहिजे . तसेच हे पुस्तक शाळा व कॉलेज मधील ग्रंथालयात असायला पाहिजे म्हणजेच आपल्या आजच्या युवा पिढीला डॉ आंबेडकर समजतील.

(आप एजुकेशन मिरर को फ़ेसबुक, ट्विटर और इंस्टाग्राम पर फ़ॉलो कर सकते हैं। वीडियो कंटेंट व स्टोरी के लिए एजुकेशन मिरर के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करने के लिए यहां क्लिक करें।)

(एजुकेशन मिरर के लिए अपने लेख भेजने व सुझाव देने के लिए लिखें।
(Whatsapp: 9076578600 Email: educationmirrors@gmail.com)

 

4 Comments on “समतेचे घोषकार आंबेडकर” पुस्तकाचा आढावा

  1. ramesh sao // May 20, 2020 at 6:19 pm //

    संविधान शब्द कानावर पडल्याबरोबर आपल्याला काही तरी जाणीव होते ती आज काय व कसे जगण्याची हे सगळं घडून आणले ज्यांनी ते बाबा साहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचून चांगला आढावा नवीन पुस्तक वाचून अजून काही लिहिण्याचा हेतु असावा आशावादी तुझा बाप

  2. Gajendra Raut // May 20, 2020 at 1:21 pm //

    खूप छान संजना, पुस्तक वाचताच तुला डॉ आबेडकर कळले हे महत्त्वाचे आहे. त्यांच्याबद्दल आणखी पुस्तके वाचल्यानंतर तुला आंबेडकरांच्या जिवनाचे विविध पैलू कळतील. इथेच न थांबता असेच वाचन आणि लिखाण करत जा. वाचन आणि लिखाणामध्ये सततता राखल्यानेच व्यक्तिमत्वा मध्ये निखार येईल.

  3. Sanjana l read your book review I liked it
    It encouraged me to read this book

  4. Anonymous // May 20, 2020 at 1:00 pm //

    Very nice sanjana keep it up

इस लेख के बारे में अपनी टिप्पणी लिखें

%d bloggers like this: